Bmc Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी लिपिक पदासाठीन एकूण 1 हजार ८४६ पदांची भरती जाहीर झाली आहे त्यामध्ये उमेदवारांनी अर्क ऑनलाईन पद्धतीने दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर जावून अर्ज भरायचा आहे.
Organization Name: BMC- Brihanmumbai Municipal Corporation
Total Post: 1,846
Post Name: Multiple Post check notification PDF
Job Location: Mumbai
Apply Method: Online
Start Apply: 20 August 2024
Last Date: 09 September 2024
Notification PDF: Click Here
Apply Link: Click Here
Official Website: Click Here
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.
ZP Palghar Bharti 2024- Zp Palghar Recruitment 2024 (जिल्हा परिषद पालघर भरती)
Supreme Court Of India Recruitment: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मे 10 वी पास के लिये भर्ती
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
BMC Executive Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८११०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६ ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार, दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.
उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.